ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि वयम फॉरेस्ट नर्सरी मार्फत 'स्थानिक वृक्ष लागवड' कार्यक्रम संपन्न.

सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि वयम फॉरेस्ट नर्सरी मार्फत 'स्थानिक वृक्ष लागवड' कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 14 Jul 2024 12:25 PM
वाचन संख्या 102

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि वयम फॉरेस्ट नर्सरी, काळसे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक वृक्ष लागवड कार्यक्रम काळसे -धामापूर येथे संपन्न झाला. स्थानिक वृक्षांची लागवड ही त्या परिसंस्थेला, त्याठिकाच्या जैवविविधतेला, मृदेला उपयुक्त ठरते याच उद्देशाने स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास करून स्थानिक वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
           
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी स्थानिक वृक्ष पंगारा याच्या संख्येत झालेली घट व त्यामागच्या कारणांची सखोल माहिती व स्वानुभव कथन करून स्थानिक वृक्ष संवर्धन महत्त्व स्पष्ट केले. तसेच वयम फॉरेस्ट नर्सरी, काळसे चे श्री. प्रथमेश काळसेकर यांनी स्थानिक वृक्षाचा त्यांनी केलेला अभ्यास, स्थानिक प्रजातीचे महत्त्व विषद केले. महाविद्यालयाचे एन एस एस व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ देविदास हारगिले यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन याविषयी माहिती दिली.यावेळी उंबर, पिंपळ, आपटा, कदंब, सातवीन, कुंभ, करंज, ऐन, बेल, चिंच, टेटू, इरय, सीताअशोक, हिरवा, चाफा, नागचाफा, ताम्हण, बकुळ, कांचन, बहावा, सुरंगी या स्थानिक प्रजातींची एकूण ७५ झाडे लावण्यात आली. ही सर्व झाडे वयम फॉरेस्ट नर्सरी,काळसे यांच्या मार्फत पुरविण्यात आली होती.
          
       
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर,  एन एस एस प्रमुख डॉ. प्रा. देविदास हारगिले, काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर, वयम फॉरेस्ट नर्सरीचे प्रथमेश काळसेकर, प्रणव काळसेकर, शैलेश काळसेकर, स्यमंतक चे मोहम्मद शेख, मनोज धमापूरकर, विष्णू परब आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे ५० एन एस एस विद्यार्थी आणि काळसे, धामापूर येथील स्थानिक ग्रामस्थ अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हसन खान तर आभार प्रा. प्रमोद खरात यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स