फोवकांडा पिंपळ ते काॅलेज रोड दरम्यान तुटून पाण्यात पडलेल्या वीजेच्या तारांची झाली तत्काळ दुरुस्ती. !
माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत आणि वीज कर्मचारी यांची तत्परता.
मालवण | प्रतिनिधी : जोरदार वारा व मुसळधार पावसाने,
मालवण नगरपरिषद हद्दीतील फोवकांडा पिंपळ ते काॅलेज रोड या महत्वाच्या मार्गावर, रात्री वीजेच्या तारा तुटल्या व जमिनीवर पाण्यात पडल्या. भर पावसात माजी नगरसेवक व बांधकाम सभापती यतीन खोत यांनी धोकादायक अशा घटनास्थळी जात पहाणी केली व त्यांनी तत्काळ वीज कर्मचारी प्रदीप मोडक, सिद्धेश बांदेकर, आशीर्वाद लुडबे यांना पाचारण करुन त्या वीज वाहिन्या तथा वीजेच्या तारा तत्काळ दुरुस्त करुन घेतल्या व वीज पुरवठा सुरळीत झाला.
परीसरातील नागरीकांनी या तत्परतेबद्दल माजी नगरसेवक यतीन खोत आणि वीज कर्मचारी प्रदीप मोडक, सिद्धेश बांदेकर व आशिर्वाद लुडबे यांचे आभार मानले
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)