ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वाफोली पुल खड्डेमय ; निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन धारकांना नाहक त्रास.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वाफोली पुल खड्डेमय ; निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन धारकांना नाहक त्रास.

प्रकाशन: 15 Jul 2024 01:48 AM
वाचन संख्या 98

बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा दाणोली मार्गावर वाफोली नळ योजना विहिरी जवळील पुलावर खड्डेमय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गत वर्षी प्रमाणे यंदाही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला व पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दोन महिन्यांपुर्वी केलेले डांबरीकरण असून देखील, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावर भले – मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे.
 
वाहन धारक संबंधित विभागाच्या व ठेकेदाराच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. आंबोली, आजरा, स्थानिक युवक हे गोवा मोपा विमानतळ येथे कामासाठी याच जवळच्या मार्गाचा अवलंब करत आहे. रात्रीचा अपरात्रीचा प्रवास करताना पुलावरील खड्डे पाहून जीव मुठीत घेऊन येतात. बेळगाव,काेल्हापूर,पुणे तसेच आंबोली वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याच अवलंब करत असतात.

संबधित विभागाने तात्काळ सदर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा भविष्यात या ठिकाणी अपघात घडून कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा वाफोली सरपंच उमेश शिरोडकर यांनी दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स