सावंतवाडी येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे माजी आमदार राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन.
बांदा | राकेश परब : पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत सावंतवाडी येथे गुरुवारी ११ जुलै रोजी सकाळी ५ : ३० वाजता संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिराला उद्घाटक म्हणून माजी आमदार राजन तेली तर अध्यक्ष म्हणून पतंजलि योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री. शेखर बांदेकर उपस्थित होते. यावेळी श्री महेश भाट, मयुरेश गवंडळकर, श्री. दत्तात्रय निखार्गे, श्री. सर्वानंद दळवी, श्री रावजी परब, सौ. श्वेता कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दीप – प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा नाईक यांनी केले .
या शिबिरास सावंतवाडीतील योगाभ्यास प्रेमींनी, तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला. वैश्य भवन संस्थेच्या व्यवस्थापकांनी या शिबिरासाठी लागणारे सभागृह, स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)