ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'सिंधुदुर्गची नवी कविता' काव्यग्रंथात कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश.

'सिंधुदुर्गची नवी कविता' काव्यग्रंथात कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश.

प्रकाशन: 07 Jul 2024 03:58 AM
वाचन संख्या 100

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्गातील नव्या कवींना मंच उपलब्ध करून देऊन त्यांची काव्य गुणवत्ता महाराष्ट्रातील चांगल्या वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी समाज साहित्य प्रतिष्ठान या चळवळीच्या माध्यमातून ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा ग्रंथ संपादित करण्यात आला. समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी संपादन केलेल्या या काव्यग्रंथात परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते तथा नवोदित कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा काव्यग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कोकणबरोबरचे महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता वाचकांसमोर यावी या एकमेव हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची नवी कविता हा १६ कवींचा कवितांचा सहभाग असलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यात कवयित्री प्रियदर्शनी पारकर म्हाडगुत, डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, किशोर कदम, चेतन बोडेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत – भोसले, योगिता शेटकर, प्रा. संतोष जोईल, दिलीप चव्हाण, पल्लवी शिरगावकर, सुरेश बिले, रचना रेडकर, मंगल नाईक – जोशी, संदीप कदम आणि सत्यवान साटम यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा समावेश आहे.

कवी किशोर कदम हे कलमठ गांवचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या पाच कवितांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला हा गांवचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. कवी किशोर कदम यांचे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, ओसरगांवच्या सरपंच सुप्रीया कदम, जिवबा अपराज, सुरेश हरकुळकर, शितल दळवी, राजश्री तांबे, प्रमीता तांबे यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स