शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय विद्यालय परीक्षेत कणकवली क्र. ३ चे सुयश.
शिरगांव | प्रतिनिधी : कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्र. ३ यांचा इयत्ता पाचवीचा कु. ओम आनंद हळवे हा ३०० पैकी २३६ गुण मिळवून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरी विभागात १४ वा आला आहे. शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा ओम हा एकच विद्यार्थी आहे.
कु. ओम याला याला वर्गशिक्षक श्री संतोष घाडीगावकर श्री लक्ष्मण पावसकर श्रीमती अश्विनी साटम, श्री संजय तांबे श्री निवृत्ती गुरव, श्रीमती वर्षा करंबेळकर यांचे मार्गदर्शन लाभले याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे तसेच सर्व सहकारी शिक्षक यांनी ओम चे विशेष अभिनंदन केले आहे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश चव्हाण उपाध्यक्ष सौ सायली राणे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच माता पालक व शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य यांनी देखील शाळेच्या उज्वल यशाबद्दल ओम चे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
इयत्ता पाचवीची आर्या अजय फोंडेकर या विद्यार्थिनीची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे आर्याचे व वर्गशिक्षक श्री संतोष घाडीगावकर यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे ओम आणि आर्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्व पालक वर्गातून विशेष कौतुक होत आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)