कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. श्री. संजय नाईक यांचे आकस्मिक निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक व पेंडूरचे रहिवासी प्रा. संजय नाईक ( वय : ५४ वर्षे ) यांचे आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. शिक्षण क्षेत्रासह ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. उपक्रमशील मुख्याध्यापक अशी ओळख असलेले प्रा. संजय नाईक हे आपल्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कट्टा पंचक्रोशीसह संपूर्ण शिक्षण क्षेत्राला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने मालवण तालुक्यात, विविध क्षेत्रातून श्रद्धांजली दिली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, काका, तीन भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)