ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना ( उ. बा. ठा. )  तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची अर्थसंकल्पावर टीका..!

शिवसेना ( उ. बा. ठा. ) तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची अर्थसंकल्पावर टीका..!

प्रकाशन: 30 Jun 2024 04:28 PM
वाचन संख्या 154

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना ( उ. बा. ठा.) मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणासाठी भरीव तरतूद सरकारने केलेली नाही अशी टीका केली आहे. २९ जून रोजी, मालवणच्या शिवसेना कार्यालय शाखेत आयोजीत पत्रकार परीषदेत ते बोलत होते. तालुका प्रमुख हरी खोबरेकर म्हणाले की, वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्याचा डाव सरकारने आखल्याचे समजल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या आमदार, खासदार व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी आवाज उठविल्यामुळेच सरकारला हा प्रकल्प वेंगुर्ले येथेच ठेवण्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागली. राज्यातील भाजप सरकारने यापूर्वी केलेल्या अनेक घोषणा हवेतच विरल्या आहेत. आता सादर केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणाही फसव्या आहेत. अर्थसंकल्पात कोकणातील माड, आंबा, काजू बागायती व्यवसायिकांचा विचार केलेला नाही. शेतकऱ्यांना गृहीत धरून अर्थसंकल्प केलेला नाही. या अर्थसंकल्पात सौर ऊर्जेसाठी तरतूद असून कोकणातील चक्रीवादळे, वारा पाऊस यात सौर पॅनल तग धरणार का? याठिकाणी भूमिगत वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. वीज बिलात माफी मिळावी, थकबाकीत सूट मिळावी अशी आमची मागणी आहे. कोकणातील मच्छिमारांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही भरीव तरतूद नाही व योजना नाही. येथील मच्छिमार, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक यांच्यासाठी महत्वाची असणारी आणि दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी महत्वाची असणारी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या सिंधुरत्न योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही, असे सांगून श्री खोबरेकर म्हणाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या असून दोन महिने लोकांना भुलवण्यासाठी भूलभुलैय्या असलेला हा अर्थसंकल्प आहे, हा फसवा अर्थसंकल्प निवडणुकी पूर्वीचे गाजर आहे या भूलभुलैय्या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध करतो असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात स्कुबा डायविंग स्कुलची घोषणा करण्यात आली असली तरी आज स्कुबा डायविंग व्यवसाय करताना व्यवसायिकांना अनेक जाचक अटीना सामोरे जावे लागते, कोणत्याही व्यवसायिकाला अधिकृत परवाना दिलेला नाही, व्यवसायिकांना परवाना देणारी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे, स्कुबा डायविंगचे पॉईंट निश्चित होणे महत्वाचे आहे, मात्र त्याबाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महिलांना सुरक्षित करण्याचे सोडून त्यांना आर्थिक गोष्टींकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झाला आहे. अर्थसंकल्प फसवा असून यातून काही चुकीच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडू, काय चूक, काय बरोबर ते जनतेला आम्ही दाखवून देऊ, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

यावेळी शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेतर, महेंद्र म्हाडगुत, दीपक देसाई, सचिन गिरकर, अक्षय रेवंडकर, सिद्धेश मांजरेकर, प्रवीण लुडबे, बंड्या सरमळकर, यशवंत गावकर, जयदेव लोणे, चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स