माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या पुढाकारातून चंडिका मांड परिसरात साचणारे पाणी जाण्यासाठी मोरीचे काम प्रशासनाकडून सूरू.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील चंडिका मांड परिसरातील सदा माडये कंपाउंड समोर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचते. परिसरातील घरात हे पाणी जाऊन धोका निर्माण होत होता. या ठिकाणी साचणारे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी मोरी बांधकाम माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सूरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मोरी बांधल्यास पाणी सुलभ पणे वाहून जाईल अशी मागणी केणी यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार काम सूरू करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)