भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने कांदळगांव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीची स्वखर्चाने सुरवात.
मालवण | प्रतिनिधी : भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतीच मालवण तालुक्यातील, छप्पर कोसळलेल्या कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ या प्रशालेची नुकतीच पहाणी केली होती. त्या नंतर त्यांनी सदर दुरुस्ती स्वखर्चाने तात्काळ केली जाईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील आहोत असे सांगितले. तसेच प्रशासनाने जर विलंब केला तर स्वखर्चाने आपण स्वखर्चाने शाळा दुरुस्त करणार असे, भाजपा नेते निलेश राणे यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांच्या माध्यमातून स्वखर्चाने शाळा दुरुस्तीची सुरवात केली गेली आहे. ग्रामस्थ, यांच्या वतीने नेते निलेश राणे यांच्या तत्पर कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)