ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शाळेच्या छपर दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता ; कांदळगांव सरपंचांचा दावा.

शाळेच्या छपर दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता ; कांदळगांव सरपंचांचा दावा.

प्रकाशन: 26 Jun 2024 06:27 PM
वाचन संख्या 130

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कांदळगांव गांवचे सरपंच श्री. रणजीत परब यांनी या दुर्घटने बद्दल जिल्ह्यातील सत्ताधार्यांना जबाबदार धरले आहे व यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे. मालवण तालुक्यातील कांदळगांव जि प. शाळा नंबर २ चे छप्पर, १५ जूनला कोसळून हानी झाली. हे छप्पर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त होते. शाळांच्या छप्परांची दुरुस्ती जिल्हा नियोजनच्या निधी मधून केली जाते.त्यासाठी वेगळा कुठलाही निधी नसतो. ग्रामपंचायत देखील छप्पर दुरुस्तीचा खर्च करू शकत नाही. त्यामुळे कांदळगांव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सातत्याने आम्ही जिल्हा नियोजनकडे आणि जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत स्तरावरून पाठपुरावा करत होतो. आमदार वैभव नाईक यांनी देखील निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. तरी देखील जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांकडून कांदळगांव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. जिल्हा नियोजनचे पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च करण्यात आले. शाळा दुरुस्ती ऐवजी सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला त्याचबरोबर शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला असे कांदळगांव सरपंच यांचे म्हणणे आहे.दरम्यान पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लक्ष नसल्याने निधी अभावी नादुरुस्त असलेले छप्पर कोसळले. त्याला सर्वस्वी सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. मात्र सत्ताधारी भाजपचा बेजबाबदारपणा झाकण्यासाठी दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी शाळेच्या कोसळलेल्या छप्पराची पाहणी केली असा आरोप कांदळगांव सरपंच यांनी केला आहे. परंतु यावर दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची हिंमत माजी खासदार निलेश राणे दाखवतील का असा सवाल कांदळगांव सरपंच श्री. रणजित परब यांनी केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 19
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स