हडी येथील कै. शिवाजी सुर्वे यांच्या कुटुंबियांचे आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील हडी जठारवाडी येथील कै. शिवाजी लक्ष्मण सुर्वे ( वय ३० वर्षे ) या तरुणाचा नुकताच अपघात होऊन दुःखद निधन झाले. त्यामुळे सुर्वे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कै. शिवाजी सुर्वे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष आमरे, हडी शाखाप्रमुख मयूर करंगुटकर, उपशाखाप्रमुख महेश सुर्वे, ग्रा. प. सदस्य भावेश सुर्वे, उमेश हडकर, महादेव सुर्वे, राजन सुर्वे,राघो साळकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)