ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील एम. एस. ए. टी. विभागात विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीत स्वागत...!

व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील एम. एस. ए. टी. विभागात विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीत स्वागत...!

प्रकाशन: 25 Jun 2024 02:11 PM
वाचन संख्या 145

सुप्रसिद्ध उद्योजक श्री. शशी पित्रे यांनी केले विशेष मार्गदर्शन.

बांदा | राकेश परब : आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण करुन नोकरी मिळणे आज खुप कठीण झाले आहे. त्यामुळे आपण शिक्षणानंतर उद्योग सुरू करून उद्योजक बना, तुम्ही खरचं नशीबवान आहात की तुमच्या प्रशालेत एम. एस. ए. टी सारखा तंत्रविषय शिकवला जात आहे असे मत व्ही. एन‌. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एम. एस. ए. टी, विभागाच्या आठवी मधील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रम मध्ये बोलताना प्रसिद्ध उद्योजक श्री. शशी पित्रे यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, जेष्ठ निदेशिका सौ. रिया देसाई,आदि मान्यवर उपस्थित होते. पित्रे पुढे म्हणाले या प्रशाळेलेमध्ये एस. एस. ए. टी. हा विषय सन २००८ पासून शिकवला जात आहे. या विषयामुळेच या प्रशालेतील जास्तीत जास्त विद्यार्थी इंजिनिअरींग कडे वळले आहेत.

एम. एस. ए. टी. विभागातील चार ही विभागाची सविस्तर माहिती मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी दिली आणि एम. एस. ए. टी. विभागात आलेल्या आठवी मधील विद्यार्थ्यांंचे स्वागत केले. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजकांचे मार्गदर्शन तसेच मान्यवरांच्या हस्ते आठवी मधील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेट वस्तू, चाॅकलेट देऊन विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी निदेशक भूषण सावंत, राकेश परब, गायत्री देसाई, इयत्ता आठवी मधील विद्यार्थीं व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्री. राकेश परब तर आभार सौ.गायत्री देसाई हीने मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स