ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
बांदा येथे दिवंगत विद्या बिले यांच्या कुटुंबीयांना भाजप तर्फे आर्थिक मदत.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा येथे दिवंगत विद्या बिले यांच्या कुटुंबीयांना भाजप तर्फे आर्थिक मदत.

प्रकाशन: 16 Jun 2024 09:07 PM
वाचन संख्या 158

बांदा | राकेश परब : बांदा येथे विद्युतभारित वाहिनी अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या विद्या बिले यांच्या कुटुंबीयांना भाजपतर्फे आर्थिक मदत देण्यात आली. पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आर्थिक मदत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

गेल्या महिन्यात विद्या बिले या कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असताना त्यांच्यावर विद्युत वाहिनी कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. बिले कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना दिली होती. त्यानुसार त्यांनी आर्थिक मदत दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा सदस्य प्रमोद रावराणे, माजी सभापती शीतल राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते. भाजपने कठीण आर्थिक परिस्थितीत दिलेल्या मदतीच्या हातभाराबद्दल बिले कुटुंबियांतर्फे भाजपचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स