ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
खासदार नारायण राणे यांचे मालवणात जल्लोषात स्वागत.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

खासदार नारायण राणे यांचे मालवणात जल्लोषात स्वागत.

प्रकाशन: 16 Jun 2024 03:50 PM
वाचन संख्या 289

मालवण | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये विजय मिळवल्यानंतर प्रथमच मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे, काल मालवणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे यांच्यासोबत सौ. निलमताई राणे उपस्थित होत्या.

यावेळी कुंभारमाठ येथे ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खासदार नारायण राणे यांनी पुष्पहार अर्पण करत पूजन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा ( भाजयुमो) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी खासदार नारायण राणे दाखल झाले आणि त्यावेळी मालवणातील व्यापारी, तसेच अन्य नगरिक यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन केले. शिवसेना ( शिंदे गट ) यांच्या पदाधिकारी यांनीही उपस्थित राहात खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स