ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कृष्णा गावडे सारख्या कलावंताने मेहनत घेतल्यास भविष्य उज्वल आहे ; ममता चिटणीस यांचे रोणापाल आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत.

कृष्णा गावडे सारख्या कलावंताने मेहनत घेतल्यास भविष्य उज्वल आहे ; ममता चिटणीस यांचे रोणापाल आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत.

प्रकाशन: 08 Jun 2024 07:16 PM
वाचन संख्या 153

रोणापाल येथील युवा कलावंत कृष्णा गावडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन ; रोणापाल सरपंच योगिता केणी, माजी सरपंच सुरेश गावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल येथील युवा चित्रकार कृष्णा गावडे यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन रोणापाल आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोणापाल सरपंच योगिता केणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृष्णा गावडे यांच्या कलेची सर्वांनी प्रशंसा केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार ममता चिटणीस, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी, मडूरा उपसरपंच बाळू गावडे, गजानन केणी, साहिल नाईक, अभिषेक कुणकेरकर, रामचंद्र गावडे, श्रृती गाड, अमोल शेगडे, अथर्व नाईक, तुकाराम मयेकर, अक्षय परब, अर्जुन रुबजी, सुरेश रूबजी, किशोर धुरी, देवेंद्र पालव, दिव्या पालव, वामन पालव, कनिष्का केणी, युगा पालव, घनश्याम गावडे, सुभाष भाईप, संतोष जाधव, सुधीर नाईक, मोहन गवस आदी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार ममता चिटणीस त्यांच्या मनोगतात म्हणाल्या की कोकणात ग्रामीण भागातील मुलांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. प्रत्येकातील सुप्त कला ओळखून त्या कलेला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. कृष्णा गावडे याची पेंटिंग खूप सुंदर आहेत. त्याने अधिक शिक्षण घेऊन मेहनत केल्यास त्याला या क्षेत्रात उज्वल भविष्य असल्याचे सांगितले.

   
सुरेश गावडे म्हणाले, रोणापाल सारख्या ग्रामीण भागातील कृष्णा गावडे याची पेंटिंग आकर्षक आहेत. या क्षेत्रात नाव कमविण्याची त्याला संधी आहे. यासाठी सर्वांनी त्याला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.  कृष्णा गावडे हा आत्ताच विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला असून कला क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स