ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजपच्या नेत्रदीपक विजयात रत्नागिरी - सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा मोठा वाटा : रविकिरण तोरसकर.

भाजपच्या नेत्रदीपक विजयात रत्नागिरी - सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा मोठा वाटा : रविकिरण तोरसकर.

प्रकाशन: 08 Jun 2024 06:06 PM
वाचन संख्या 123

खासदार नारायण राणे यांच्या रूपाने आता अनुभवी आणि सक्षम खासदार संसदेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार असल्याचीही आशा केली व्यक्त.

मालवण | प्रतिनिधी : भाजपा मच्छिमार सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक श्री रविकिरण तोरसकर यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपा तथा महायुतीचे उमेदवार खासदार नारायण राणे यांच्या विजया नंतर आज एका प्रसिद्धी पत्राद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे की,
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांनी आपले प्रतिस्पर्धी माजी खासदार विनायक राऊन यांच्यावर ४८००० पेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रात पुढे सांगितले आहे की, खासदार श्री. नारायण राणे यांच्या या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर देवगड (नगर पंचायत)व मालवण, वेंगुर्ला अश् दोन नगरपालिका असून ३५ ग्रामपंचायत आहेत. या सर्व ३८ गावामध्ये खासदार श्री. नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०६ मतदान केंद्रे(बूथ)असून यापैकी ९४ मतदान केंद्रावर खासदार्री नारायण राणे यांनी आघाडी मिळवली. एकंदर मतदानापैकी खासदार नारायण राणे यांना २९,२७५ तर पराभूत उमेदवार विनायक राऊत यांना १८५३९ मते पडली म्हणजेच खासदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात तब्बल १०७३६एवढे मताधिक्य मिळाले. खासदार नारायण राणे यांच्या रूपाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलले आहे. यामध्ये सिंधुदु्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे रविकिरण तोरसकर यांनी भाजपा मच्छीमार सेल तर्फे आभार मानले आहेत.

किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते .खासदार नारायण राणे यांच्या रूपाने आता अनुभवी आणि सक्षम खासदार संसदेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे, भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स