ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळाशील खाडी किनारी होडी बुडाली ; एकाने पोहत किनारा गाठला तर दोघांचा शोध सुरु.

तळाशील खाडी किनारी होडी बुडाली ; एकाने पोहत किनारा गाठला तर दोघांचा शोध सुरु.

प्रकाशन: 09 Jun 2024 10:57 AM
वाचन संख्या 248

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तळाशील खाडी किनारी छोटी होडी (पात) बुडाली. होडीत तीन जण होते त्यापैकी एकाने पोहत तळाशीलचा किनारा गाठला . मात्र अन्य दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले. काल शनिवारी ८ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या वाऱ्या पावसात होडी नदीपात्रात (खाडी) उलटल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे समजते. बोटीवरील अन्य दोघांचा शोध सुरु आहे.

मालवण पोलिसांनी दिलेल्या महिनानुसार किशोर महादेव चोडणेकर (वय ५५), त्यांचा मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय १४), दोन्ही रा. तळाशील मालवण तसेच धोंडीराज परब (वय ५५) मूळ रा. तारकर्ली हे तिघे काल सायंकाळी उशिरा तळाशील खाडीमध्ये पात (छोटी होडी) घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. सर्जेकोट तळाशील समोर होडी असताना असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे होडी खाडीत उलटल्याने तिघेही जण पाण्यामध्ये पडले.

होडीतून पाण्यात पडलेल्या तिघांपैकी लावण्य किशोर चोडणेकर या मुलाने पोहत पोहत तळाशील किनारा गाठला. आपल्या सोबत असलेले वडील किशोर चोडणेकर व धोंडीराज परब हे दोघेही पाण्यामध्ये बेपत्ता झाल्याचे त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना सांगितले. पाण्यात बुडालेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध सूरू असून रात्रीचा अंधार तसेच पाऊस असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून सकाळ पासून शोध मोहीम सूरू आहे. याबाबत माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स