ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मतदानाबाबत आपण कधी जागृत होणार ; समाजसेवक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सवाल.

मतदानाबाबत आपण कधी जागृत होणार ; समाजसेवक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सवाल.

प्रकाशन: 07 Jun 2024 12:48 PM
वाचन संख्या 197

दरवेळी सरकारला किंवा कोणत्याही पक्षाला दोष देण्याची वृत्ती बळावली तर नागरीक म्हणून आपण अपयशी ठरतोय का याचे आत्मचिंतन करायची आवश्यकता असल्याचेही मांडले मत.

कणकवली | प्रतिनिधी : नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील समाजसेवक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी काही ठिकाणी, मतदारांचा मतदाना मधील कमी झालेला टक्का विषयावर एका प्रसिद्धी पत्राद्वारे भाष्य केले आहे. कुठलीच तेढ वगैरे निर्माण करायचा आपला प्रयत्न नसून नागरीक म्हणून मतदानाबाबत आपण कधी जागरुक होणार असा सवाल त्यांनी, प्राप्त होणार्या विविध ठिकाणच्या मतदान टक्केवारीवरुन केला आहे.

१०० टक्के मतदारांपैकी जर ५०% पेक्षा कमी मतदार त्यांचा मतदानाचा अधिकार बजावू शकत नसतील तर ती नागरीक म्हणून खंत आहे. निवडणूक आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक मंडळं आणि राजकीय पक्षही त्यांच्यापरीने यथाशक्ती याची जागृती करत असतात. गेल्या दशकभरात, डिजीटल माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचायचे कामही निवडणूक प्रसार यंत्रणा करत आहेच. ही सर्व देशाच्या एकत्रीत प्रगतीच्या निश्चितीची माध्यमे आहेत. या सर्व प्रयत्नांकडे गांभिर्याने पाहून नागरीक म्हणून आपण त्यांना प्रतिसाद देणे जर आपल्याला जमत नसेल तर ते खरंच चिंतनीय असल्याचेही राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे.

आपण जर राजकीय योगदान देत नसू तर दरवेळी सरकारला किंवा कोणत्याही पक्षाला दोष देण्याची वृत्ती बळावेल. ही वृत्ती बळावली तर नागरीक म्हणून आपण अपयशी ठरतोय का याचे आत्मचिंतन करायची आवश्यकता असल्याचेही राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले आहे.

प्रसिद्धी पत्रात शेवटी पेडणेकर यांनी नमूद केले आहे की आपल्या देशातील विविध युगपुरुष, स्वातंत्र्यवीर यांनी जर देशाबाबत किंवा देशातील राजकीय घडामोडींबाबत अनास्था दाखवली असती तर आज आपले जगणेही मुश्किल झाले असते. अजुनही वेळ गेलेली नसून देशातील सर्व नागरीक आगामी सर्व निवडणुकांमधून देशाचे नागरीक असल्याचे प्रामाणिक व अत्यावश्यक कर्तव्य जबाबदरपणे समजून घेतील.

मतदानाचा योग्य व कायदेशीर पद्धतीने प्रसार केलेल्या सर्व व्यक्ती, संस्था, राजकिय पक्ष व यंत्रणा यांचे समाजसेवक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी या प्रसिद्धी पत्रात विशेष प्रशंसा केली आहे. या नंतरही त्यांचे प्रयत्न सुरु रहावे असे सांगताना त्यांनी मतदान हा सुटीचा दिवस नसून तो ‘आपल्यासाठीचा’ दिवस असतो असे नमूद केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स