ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
खासदार नारायण राणे यांच्या मताधिक्याने आपण समाधानी मात्र आमदार वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा…!

खासदार नारायण राणे यांच्या मताधिक्याने आपण समाधानी मात्र आमदार वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा…!

प्रकाशन: 06 Jun 2024 11:28 PM
वाचन संख्या 132

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची खासदार नारायण राणे यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया.

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप मालवण तालुकाध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर यांनी खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा २०२४ निवडणूक विजयानंतर समाधान व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात मालवण तालुक्याने ११,६२६ एवढे मताधिक्य दिले आहे. या मताधिक्याने आपण समाधानी आहोत मात्र खासदार नारायण राणे यांना मिळालेले मताधिक्य ही आमदार वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे असे धोंडी चिंदरकर सांगितले आहे.

धोंडी चिंदरकर म्हणाले की खासदार नारायण राणे यांना मालवण तालुक्यातून ११,६२६ एवढे मताधिक्य मिळाले. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदार संघ तसेच बहुतांश गावातून राणे यांना मताधिक्य मिळाले. मात्र हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मोजक्याच मतदान केंद्रावर मताधिक्य राणे यांना मिळाले नाही. मात्र मालवण तालुक्याने नारायणराव राणे यांना मताधिक्य देताना जो विजयात मोलाचा वाटा उचलला आहे त्याबद्दल आपण समाधानी आहोत. राणे यांना मालवणसह कुडाळमधून मिळालेले मताधिक्य म्हणजे विधानसभासभा निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, आताचे मताधिक्य पाहता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्हाला नवी उर्मी मिळाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मालवण कुडाळ मतदार संघात आम्ही अधिक असेही चिंदरकर म्हणाले.तसेच लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. राणे यांच्या विजयाने मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचे आहे. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठी मेहनत घेतली, या निवडणुकीसाठी ना. रवींद्र चव्हाण हेच किंगमेकर ठरले आहेत, असेही धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स