ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर येथे खरीप हंगामासाठी खत विक्री शुभारंभ.

चिंदर येथे खरीप हंगामासाठी खत विक्री शुभारंभ.

प्रकाशन: 31 May 2024 09:12 PM
वाचन संख्या 220

आचरा | ब्यूरो न्यूज : श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, चिंदर यांचा खरीप हंगामासाठी खत विक्री शुभारंभ आज सोसायटी चेअरमन सीताराम ( देवेंद्र ) हडकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील शेतक-यांना सेंद्रिय खते, सुफला, कृषी उद्योग यासह विविध प्रकारची खते विक्री करण्यात आली.

यावेळी सोसायटीच्या बैठकीत आगामी काळात शेती कर्ज, दीर्घ
मुदत, अल्प मुदत व अन्य कर्ज वसुली करण्याबाबत चर्चा झाली. २५ जुन पुर्वी सर्व कर्जदारांकडून कर्ज वसुली व त्या कर्जदारांना नव्याने कर्ज उचल देण्याचे नियोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग बँकेच्या धोरणानुसार नव्याने कर्ज उचल शेतक-यांना देत असताना सातबारा व आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे ठरवण्यात आले. तसेच संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने विविध मुद्दांवर चर्चा झाली.

मिश्र खत, सुफला, मायसिग्रीन, युरिया खते उपलब्ध असून सुफला आणि युरिया खतावर आधारकार्ड आवश्यक असून 9421638236 व 8010408816 या क्रमांकांवर संस्थेचे सचिव कविंद्र माळगावकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी व्हाईस चेअरमन सुनिल पवार, संचालक दिगंबर जाधव, तज्ञ संचालक विवेक परब, आप्पा गावडे, संस्था सचिव कविंद्र माळगावकर, वासुदेव मुळे, विनोद खोत आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स