ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट ; विविध प्रश्नांबाबत करणार चर्चा.

आमदार वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट ; विविध प्रश्नांबाबत करणार चर्चा.

प्रकाशन: 29 May 2024 12:54 PM
वाचन संख्या 164

नागरिकांच्याही समस्या, अडचणी असतील तर उपस्थित राहण्याचे केले आवाहन

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या गुरुवारी ३० मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक गावात पाणी टंचाईची झळ बसली आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी दुपारी १२ वाजता आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. जर नागरिकांच्या पाण्यासंदर्भात तसेच अन्य काही समस्या, अडचणी असतील तर त्याबाबतचे निवेदन घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स