भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरेचा निकाल १०० टक्के.
मसुरे | प्रतिनिधी : माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मसुरेचा दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी १०० टक्के लागला आहे. बाबुराव समीर परब (९०.००%), वरद सतीश वाळके (८६.४०%), अच्युत अजय प्रभूगावकर (८५.००%) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. एकूण १२ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
विशेष योग्यता श्रेणीत ६, प्रथम श्रेणीत ४, द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या प्रशालेचा बाबुराव परब हा विध्यार्थी मसुरे केंद्रात प्रथम आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रकाश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, संस्था पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, माजी मुख्याध्यापक किशोर देऊलकर, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर आदींनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)