बिळवस हायस्कूलचा निकाल १०० टक्के.
मसुरे | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या, माध्यमिक विद्यालय बिळवसचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक कुमारी संजना प्रदिप हळवे (८५.२०%), द्वितीय क्रमांक वैभवी विलास गावडे( ८२.६०%),
तृतीय क्रमांक साक्षी संतोष पालव (८९.४०%) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. सुर्यकांत पालव, सरचिटणीस श्री. अशोक पालव, मुख्याध्यापक श्री. जयवंत ठाकूर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)