अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्पवर कारवाई ; २४ रॅम्प केले जमीनदोस्त…!
मसुरे | प्रतिनिधी : कालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल – बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्पवर, श्री सुहास चव्हाण ( मंडळ अधिकारी, मसुरे) यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे (तहसीलदार, मालवण) यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये मर्डे ७ रॅम्प, डांगमोडे १२ रॅम्प, कोईल ५ रॅम्प असे एकूण २४ रॅम्प महसूल पथकाने जेसीबी च्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई करताना श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्यासह श्री. संतोष गुरखे (मंडळ अधिकारी पोईप), श्री. एस. पी. लखमोड (तलाठी बांदिवडे), श्री. डी. सी. ठाकूर (तलाठी पोईप), श्री. वाय. ए.काय माळी (तलाठी हिवाळे), श्री. एम. एस. काटे (तलाठी असरोंडी), श्री. संतोष चव्हाण(कोतवाल देऊळवाडा), श्री. सचिन चव्हाण (कोतवाल मसुरे), श्री. विकास पोयरेकर (कोतवाल त्रिंबक), श्री. संतोष नाईक (कोतवाल पोईप) हे या महसूल पथकामध्ये सहभागी होते.
महसूल विभागाची कार्यवाही या भागामध्ये पडणार याची आधीच कुण कुण लागल्यामुळे या परिसरातील अनधिकृत वाळू उत्खलन करणाऱ्या सर्व होड्या या पथकाला आढळून आल्या नाहीत. याबाबत या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाळू उत्कलन होत असून या ठिकाणी जर पुन्हा अनधिकृत वाळू उत्खलन झाल्यास पुन्हा एकदा महसूल विभागाच्या वतीने कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या जमिनीमध्ये रॅम्प आढळून येतील त्या जमीन मालकांवरही सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती बोलताना मसुरे मंडल अधिकारी एस आर चव्हाण यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)