ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शांतीचा मार्ग सुखाकडे नेईल ; प्रभाकर हडकर यांचे मसुरे येथे प्रतिपादन.

शांतीचा मार्ग सुखाकडे नेईल ; प्रभाकर हडकर यांचे मसुरे येथे प्रतिपादन.

प्रकाशन: 25 May 2024 11:39 AM
वाचन संख्या 121

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या, मसुरे बौद्ध विकास मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रभाकर हडकर यांनी उद्बोधन केले. जगामध्ये हिंसांचे प्रकार वाढत असून याला आळा घालण्यासाठी तथागतांचा धम्मच सावरू शकेल. तथागतांचे सम्यक विचार, सम्यक वाणी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारवी असे यावेळी प्रभाकर हडकर म्हणाले. यावेळी विचार मंचावर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष सुगंध तांबे, मुंबई मंडळाचे सचिव संतोष तांबे, अनिल तांबे, बाबुराव तांबे, मिलिंद तांबे, राजेंद्र तांबे, दीपक तांबे, मुरलीधर तांबे,सागर तांबे, गणेश तांबे, प्रमिल तांबे, महिला मंडळाच्या अध्यक्ष वेदिका तांबे, मृणाल तांबे, अवंतिका तांबे, मेनका तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळच्या सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये लागणारे साहित्य वितरीत करण्यात आले. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बीएमसी मधून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर तांबे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच वाडीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात त्यावेळी भोजनाची व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळणारे सुभाष कासले, बबन तांबे यांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे आणि आभार सागर तांबे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स