ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरा गांव चार दिवस अंधारात ; स्थानिकांमध्ये संताप..!

मडुरा गांव चार दिवस अंधारात ; स्थानिकांमध्ये संताप..!

प्रकाशन: 25 May 2024 10:28 AM
वाचन संख्या 84

आठवडाभर विजेचा लपंडाव होता सुरु ; सहा. अभियंता यांची तत्काळ बदली करायच्या मागणीला जोर.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा गावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या निष्क्रियतेमुळे गेले चार दिवस वीज पुरवठा गायब आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण करून अद्यापही कोणती कार्यवाही करण्यात येत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. गेले आठ दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नळ पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. त्यामुळे वृद्ध महिलांसह नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. सहाय्यक अभियंता अनिल यादव यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.

पहिल्याच अवकाळी पावसात महावितरणच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. उन्हाळ्यात वीज वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न केल्याने मडूरा गाव अद्यापही अंधारात आहे. ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांची मिलीभगत असल्याने वीज खांबावर वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट असल्याने या समस्या वारंवार येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

गेले आठ दिवस मडूरे गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. साहजिकच त्याचा विपरीत परिणाम नळ पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. आठ दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने वृद्ध महिलांसह नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. स्थानिकांनी सहाय्यक अभियंता अनिल यादव यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला. केवळ वीज बीले वसुलीसाठी ते तत्परता दाखवितात. काम मात्र शून्य असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अशा निष्क्रिय अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणी वीज ग्राहकांनी केली. याबाबत अनिल यादव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स