स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा एच. एस. सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के…!
मालवण | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय एच. एस. सी परीक्षा फेब्रु /मार्च २०२४ चा निकाल १००% लागला असून महाविद्यालयाने निर्भेळ यशाची परंपरा कायम ठेवली आहे. १२ वी परीक्षेस एकूण ६१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. कला शाखेमधून २६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १००% लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कु. क्षितिजा बयाजी खरवते (८३.५०%), द्वितीय क्रमांक कु.वैदेही मंगेश ठाकूर (७२.१७%) व कु. आदेश अविनाश हाक्के (७२.१७%) आणि तृतीय क्रमांक कु.संदीप सुहास गांवकर (६९.३३%) यांनी पटकावला आहे.
वाणिज्य शाखेमधून ३५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १००% लागला. यामध्ये प्रथम क्रमांक कु. यज्ञा शरद पडवळ (७५.३३%) , द्वितीय क्रमांक कु. पूजा व्यंकटेश टक्के (७३.३३%) तर तृतीय क्रमांक कु. रिया रविंद्र केळुसकर (६८.५०%) यांनी पटकावला आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कृ. सि. देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव श्री. चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, शालेय समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा. हसन ख़ान, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. मिनल सामंत आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)