ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरेत उद्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा : स्पर्धेत तब्बल ४०९ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग.

तळेरेत उद्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा : स्पर्धेत तब्बल ४०९ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग.

प्रकाशन: 17 May 2024 09:07 PM
वाचन संख्या 160

तळेरे | निकेत पावसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उद्या १८ मे रोजी सकाळी ११ वाजता तळेरे येथील प्रज्ञांगन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ युवा संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक प्रणय शेट्ये, सुप्रसिध्द नृत्य दिग्दर्शक, अभिनेते अनिल सुतार, अभिनेते कवी प्रमोद कोयंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. याचवेळी पुढील स्पर्धेची घोषणा करण्यात येणार आहे.

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीनही गटात मिळून एकूण ४०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पहिल्या गटात संचिता संभाजी पाटील, दुसऱ्या गटात अनुश्री अभिजीत राणे तर तिसऱ्या गटात अक्षता मारुती गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

शालेय मुलांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि मानवाला उपजत मिळालेली लेखनशैली भविष्यात कार्यरत राहावी व अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. दोन वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर तिसऱ्या वर्षीही या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन गटात घेण्यात आली.

या स्पर्धेचे परीक्षण सुलेखनकार अभिजीत राणे व सुलेखनकार युवराज पचकर यांनी केले. यावर्षी सुप्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांच्या सामाजिक आशयावरील कविता लेखनासाठी देण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
गट पहिला (पहिली ते चौथी) : (प्रथम तीन व उत्तेजनार्थ तीन) संचिता पाटील (शाळा ओटव), शिवन्या पचकर (विद्यामंदिर, लोरे-मोगरवाडी), रिया आग्रे (विद्यामंदिर, लोरे-मोगरवाडी), स्वरा ओतारी (केंद्रशाळा, साटेली भेडशी), दीपेश विटेकर (शाळा वजराट देवसू, वेंगुर्ले), सुकन्या नराम (विद्यामंदिर, लोरे)

गट दुसरा (पाचवी ते आठवी) : अनुश्री राणे (एस. एम. हायस्कूल, कणकवली), रुद्र शेटे (विद्यामंदिर, गडमठ नं. १), लक्ष्मण सावंत (श्री माऊली विद्यामंदिर, डोंगरपाल), समर्थ शिरसाट (शिवडाव विद्यालय), संकेत गावकर (शिवडाव विद्यालय), श्रेया कदम (एस. एम. हायस्कूल)

गट तिसरा (नववी ते बारावी) : अक्षता गुंजाळ (कुडाळ हायस्कूल), तनया कदम (एस. एम. कणकवली), प्रभाती देवळी (राजमाता सत्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालय), ऋतुजा परब (शिवडाव विद्यालय), वैष्णवी कुणकेरकर (कनेडी), ओंकार संजय सदडेकर (शिवडाव विद्यालय)

या बक्षीस वितरण कार्यक्रमाला सर्व विजेत्या मुलांनी आपल्या पालकांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स