ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
आनंदव्हाळ येथील अपघात ; दोघांचा मृत्यू तर १ गंभीर जखमी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आनंदव्हाळ येथील अपघात ; दोघांचा मृत्यू तर १ गंभीर जखमी.

प्रकाशन: 16 May 2024 07:30 PM
वाचन संख्या 997

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण – कसाल मार्गावरील कुंभारमाठ नजिकच्या आनंदव्हाळ येथे काल १५ मे रोजी रात्री एक दुचाकी आणि एसटी बस यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मालवण कसाल मार्गांवर आनंदव्हाळ भगवती हॉटेल जवळील वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी – मालवण (एमएच २० बी एल ३१८५) या बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी मोटारसायकलची (एम एच ०७ ए क्यू २६५८) ची धडक बसली. एसटी बसला एका बाजूला धडक देऊन मोटरसायकल रस्त्यावर कोसळली. त्या मोटरसायकलवर बसलेले तिघेही जण रस्त्यावर कोसळले. एसटी चालक, वाहक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी तत्काळ धाव घेतली आणि रुग्णावाहिकेला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मालवण पोलीस व एसटी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करण्यात आला.

या अपघातात गंभीर जखमी मोटरसायकल चालक गणेश कृष्णा निकम (वय ३० वर्षे ) रा. पोईप यांचा काल बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी राकेश पवार (वय ३० वर्षे) रा. कुंभारमाठ यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. सुनील शिवराम पवार (वय २५ वर्षे) रा. कोटकमटे (तालुका देवगड) या जखमी तरुणावर गोवा येथे उपचार सूरू आहेत अशी माहिती मालवण पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

भरधाव वेगात मोटरसायकल चालवून अपघातात स्वतःच्या मृत्यूस तसेच मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूस व मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाता बाबत मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १...

30 Oct 2026 236

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स