कोल्हापूर येथील अनेक युवक मनसेत दाखल..!
कोल्हापूर | ब्युरो रिपोर्ट : कोल्हापुरच्या अनेक तरुणांनी मनसेप्रमुख श्री राज ठाकरे यांच्या प्रेरणेने राज ठाकरेंच्या मनसेचा झेंडा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाती घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची ताकद वाढण्यासाठी आता सर्व जिल्ह्य़ांतील युवा पातळीवर सक्रीय झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन गेल्या काही दिवसांपासून मनसेत पक्ष प्रवेशाचा धडाकाच लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हमीदवाड येथे अनेक तरुणांची मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उप जिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ, तालुका अध्यक्ष संजय पाटील, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर, विद्यार्थी सेना कार्यकारणी सदस्य वैभव माळवे, तेजस गांजले यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील मनसेची ताकद वाढवायचा उद्देश ठेवून अनेक शहरस्थित मनसे पदाधिकार्यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा त्यांच्या संपर्ककक्षेत आणायचे व शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना जोडायचे विविध कार्यक्रम आखले आहेत असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)