वायंगणीचे सुपुत्र उमेश सावंत यांची भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड
आचरा | विवेक परब : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे सुपुत्र उमेश सावंत याची निवड करण्यात आली. सामाजिक कार्याची मूलतः आवड असणारे सावंत हे गेली अनेक वर्षे किसान मोर्चाशी संलग्न असून किसान मोर्चाची अनेक पदे भूषविलेली आहेत.
उमेश सावंत यांची किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच भाजप खासदार व भाजप प्रदेश सरचिटणीस आणि भाजप नेते डॉ. निलेश राणे यांनी दूरध्वनी द्वारा शुभेच्छा दिल्या.
त्याच बरोबर जिल्हाध्यक्ष राजन तेली , तसेच मालवण तालुका भाजपच्यावतीने तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व उद्योजक प्रकाश मेस्री यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका सरचिटणीस व हडी सरपंच महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, प्रकाश राणे ,ज्ञानदेव परब, जयवंत परब ,किसान मोर्चाचे महेश वरक, सचिन मेस्री,महेश सारंग, हरी केळुसकर, प्रसाद भोजने, किशोर नरे, संतोष वायंगणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)