श्री किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे : आमदार वैभव नाईक.
श्री किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या होत्या त्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी श्री. किरण सामंत यांच्या पोलिस प्रोटेक्शनची मागणी केली आहे. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे आणि दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)