ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
काळी दिवाळी साजरी करा हे सांगणारे मच्छीमार नेते आता नारायण राणे यांची तळी उचलत आहेत हे त्यांचे दुर्दैव ; शिवसेनेचे मच्छिमार नेते बाबी जोगी व सन्मेष परब यांची प्रतिक्रिया.

काळी दिवाळी साजरी करा हे सांगणारे मच्छीमार नेते आता नारायण राणे यांची तळी उचलत आहेत हे त्यांचे दुर्दैव ; शिवसेनेचे मच्छिमार नेते बाबी जोगी व सन्मेष परब यांची प्रतिक्रिया.

प्रकाशन: 04 May 2024 03:30 PM
वाचन संख्या 103

खासदार विनायक राऊत संसदेत मच्छिमारांचे प्रश्न मांडत असताना राणेंनी कधी पाठिंबा का दिला नाही ; शिवसेना शहरप्रमुख व मच्छिमार नेते बाबी जोगी आणि उपशहरप्रमुख व मच्छिमार नेते सन्मेष परब यांचा भाजपाच्या रविकिरण तोरसकरांना प्रतिसवाल..!

मालवण : शिवसेना ( उ. बा. ठा. ) शहरप्रमुख व मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी आणि उपशहरप्रमुख व मच्छिमार नेते सन्मेष उर्फ राजू परब यांनी भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांच्यावर सवालांच्या फैरी झाडल्या आहेत. रविकिरण तोरसकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मच्छिमार व मत्स्य व्यावसायिक यांनी निवडून देऊन लोकसभेत पाठवायचे आवाहन केले होते आणि नारायण राणे हे मच्छिमारांची जाण असलेले नेते असल्याचे सांगितले होते त्यावर बाबी जोगी आणि सन्मेष परब यांनी तोरसकरांना घेरले आहे.
नारायण राणे यांची जर प्रशासनावर पकड आहे आणि मच्छिमारांच्या प्रश्नांची जाण आहे तर केंद्र शासनाच्या अखत्यारीत १२ नॉटिकल माइल च्या बाहेरचे विनाशकारी व मच्छीमारांच्या जीवावर आणि पोटावर उठणारे एलईडी पर्सेसीन बोट तसेच परप्रांतीय हाय स्पीड ट्रॉलर्स का बंद नाही होत?ह्या गोष्टी बंद करण्यासाठी नारायण राणेंची प्रशासनावरील पकड हरवली आहे का? संसदेत कॅबिनेट मंत्री असताना मच्छीमारांचे किती प्रश्न राणे यांनी मांडले?खासदार विनायक राऊत यांनी संसदेत प्रश्न मांडत असताना त्यांना राणे यांनी पाठिंबा का दिला नाही, असे विविध सवाल शिवसेना उबाठा शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी आणि सन्मेष परब यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहेत.
ज्याप्रमाणे शेती करणाऱ्या जागेचा शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीचा सातबारा असतो त्या धरतीवर समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार त्यांच्या नावावर समुद्रातील सातबारा करणे हा प्रश्न पहिल्यांदाच खासदार विनायक राऊत यांनी संसदेत मांडला असेही बाबी जोगी आणि सन्मेष परब यांनी नमूद केले आहे.

पर्ससीन नेट कोणामुळे वाढले त्यांच्या पाठीमागे कोण होते पारंपरिक मच्छीमारांवर खोटे केसेस कोणामुळे दाखल झाले त्या पाठीमागे कोण होते, मच्छिमारांना पावसाळी बंदी कालावधीतील अनुदान तसेच जाळी खरेदीवरील अनुदान कुठच्या मच्छिमारांना मिळाले, पारंपरिक मच्छीमारांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ कोणामुळे आली आणि काळी दिवाळी साजरी करा हे सांगणारे मच्छीमार नेते आता नारायण राणे यांची तळी उचलत आहेत हे यांचे दुर्दैव असल्याचे प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन आजवरच्या परंपरेप्रमाणे किनारपट्टीचा मच्छीमार बांधव हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे राहील अशी ग्वाही मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी आणि सन्मेष परब यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स