तारकर्लीतील श्री साई मंदिरात श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक १२२ मध्ये महायुतीचे उमेदवार श्री. नारायण राणे यांच्या घरोघरी प्रचाराला सुरवात.
मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली देवबाग हे पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यात नारायण राणे यांचे मोठे योगदान आहे. ते योगदान तारकर्लीची तसेच जिल्ह्यातली जनता विसरणार नाही. सर्वसामान्य जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील असा मला ठाम विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी व्येक्त केला आहे.
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील श्री साई मंदिरात भिवाजी कोळंबकर, सौरभ ताम्हणकर, सुरेश बापार्डेकर यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेत बूथ क्रमांक १२२ मध्ये घरोघरी प्रचाराला सुरवात करण्यात आली. सर्वच ठिकाणी जनता राणे साहेबांना साथ देणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहेत. या वेळी मतदारसंघातील प्रचारदरम्यान भेटी होत असताना केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार नारायण राणे साहेबांना विजयी करण्याचे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्या समवेत महायुतीचे पदाधिकारी यांनी केले.
तारकर्ली येथे प्रचारदरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, बूथ अध्यक्ष किरण तारी, सुरेश बापार्डेकर, मोहन केळूसकर, गजा कुबल, गोरक्ष पराडकर, बबन मांजरेकर, शाम कोळंबकर, भिवाजी कोळंबकार, प्रदीप गांवकर, यशवंत भोवर, किरण मेस्त्री, अनिकेत केळूसकर, प्रतीक वालावलकर, वैभव तळवडकर, सर्वेश धुरत, रोहित केळूसकर, दिलीप बांदेकर, कुणाल बापार्डेकर, जतीन रोगे, तन्मय कुबल, वीरेंद्र देऊलकर, किशोर कुबल, कल्पेश केळुसकर, केशव केळुसकर, सुरेंद्र टीकम, महेश खराडे, मनोहर रोगे, नमीता गांवकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)