ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रशासनावर पकड आणि मत्स्यव्यवसायाची पुरेपूर जाण असलेले नेते श्री. नारायण राणे यांनी लोकसभेत जाण्याची गरज : रविकिरण तोरसकर.

प्रशासनावर पकड आणि मत्स्यव्यवसायाची पुरेपूर जाण असलेले नेते श्री. नारायण राणे यांनी लोकसभेत जाण्याची गरज : रविकिरण तोरसकर.

प्रकाशन: 04 May 2024 09:02 AM
वाचन संख्या 95

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नीलक्रांती साकारण्यासाठी भाजपा मछीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायीकांनी नारायण राणेंना विजयी करायचे केले आवाहन.

मालवण : भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नीलक्रांती साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करायचे आवाहन एका प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.

प्रसिध्दीपत्रात रविकिरण तोरसकर म्हणतात की, सन २०१४ ते २०२४ या कालावधीत भारतातील ८२०० किलोमीटरची किनारपट्टी तसेच मत्स्यपालन या क्षेत्राला बळ देण्यासाठी सन २०१४ ते २०१९ नीलक्रांती ही योजना तर २०२१ पासून पुढे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनांमध्ये मत्स्य व्यवसाय बरोबरच मच्छीमाराला राहती घरे, बंदी कालावधीतील अनुदान ,मासेमारी जाळी, नौका सक्षमीकरण ,वाहतूक व्यवस्था साठी इन्सुलिटेड व्हॅन प्रक्रिया उद्योग, बर्फ कारखाने त्याचबरोबर खोल समुद्रातील मासेमारी असे प्रकारच्या अनेक योजनांचा समावेश आहे त्याचा लाभ हजारो लाभार्थ्यांनी घेतला आहे. तसेच मत्स्य पालन करणाऱ्या मत्स्य शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात राबविले आहेत. ४० ते ६० टक्के पर्यंत अनुदान एवढं भरघोस अनुदान लाभार्थी यांना गेल्या दहा वर्षांमध्ये मिळालेले आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास सदर योजनेमध्ये केलेला आहे.वीस हजार कोटी रुपयांची तरतूद या पाच वर्षासाठी मोदी सरकारने केली होती .त्याचा पुरेपूर फायदा मत्स्य व्यवसायाला होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. याचा फायदा अनेक मत्स्यव्यवसायिक लाभार्थी यांना होणार आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग चा विचार केला असता अनेक लाभार्थी यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये बर्फ कारखाने, यांत्रिक नौका सक्षमीकरण, पारंपारिक नौका, जाळी खरेदी, मत्स्यपालन क्षेत्र, मत्स्य सेवा केंद्र व इतर अनेकविध योजनांचा समावेश आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि मुबलक पाण्याची व्यवस्था यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अतिशय उत्कृष्टपणे राबवण्याचे रविकिरण तोरसकर यांनी श्रेय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘सागर मित्र’ योजनेला दिले आहे .भविष्यातील मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याची व्याप्ती वाढण्याची गरज आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून आणावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या योजनेचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी नारायण राणे यांच्यासारखा प्रशासनावर पकड आणि मत्स्यव्यवसाय ची पुरेपूर जाण असलेल्या नेत्याची लोकसभेमध्ये जाण्याची गरज आहे. यासाठी सर्व मच्छीमार बांधव भगिनी ,मत्स्यव्यवसायिक, मत्स्य पालक यांना विनंती करीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी माननीय नारायण राणे साहेब यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स