ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्ह्यातील बेरोजगारांना शासनातर्फे ऑनलाईन कौशल्य विकास मार्गदर्शन.

जिल्ह्यातील बेरोजगारांना शासनातर्फे ऑनलाईन कौशल्य विकास मार्गदर्शन.

प्रकाशन: 18 Oct 2021 07:11 PM
वाचन संख्या 81

ओरोस | प्रतिनिधी : खाजगी क्षेत्रातील कारखाने, उद्योग, व्यापार, उद्योजक, दुकाने, शॉपस्‍ व इतर व्यवसाययांना सद्य:स्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हयातील बेरोजबार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, यांच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळावा २६ ते २८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांनी,www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच नोकरीच्या शोधातील उमेदवारांनीही याच पोर्टलवर स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन ॲप्लाई केलेल्या उमेदवारांना उद्योजक मुलाखतीसाठी ऑनलाईन तारीख व वेळ देवून मुलाखत ऑनलाईन घेवून अंतिम निवड करतील किंवा त्याच्या अटीशर्तीना ग्राह्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवून अंतिम निवड करु शकतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक,उमेदवारांनी ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी ०२३६२ २२८८५९, ९४०३३५०८९, या क्रमांकावर संपर्क करावा,किंवा ईमेल-sindhudurgrojgar@gmail.com असे आवाहन शा.गि.पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स