शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आगमन ; आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी केले औक्षण तर कन्या नंदिनी व चिरंजीव राजवर्धन यांनी केले विशेष स्वागत.
कणकवली : शिवसेना – इंडिया – महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथील सरकारी रुग्णालयासमोरील पटांगनात माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा सुरु होण्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी आगमन झाले.
त्यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांनी श्री. उद्धव ठाकरे यांचे औक्षण केले तर आ. वैभव नाईक यांची कन्या कु. नंदिनी नाईक, मुलगा चि. राजवर्धन नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)