ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक ३ चे निर्भेळ यश.

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक ३ चे निर्भेळ यश.

प्रकाशन: 03 May 2024 01:06 PM
वाचन संख्या 197

कु. वरद बाक्रे व कु सम्यक पुरळकर यांची इस्त्रो सफरीसाठी निवड.

शिरगांव | संतोष साळसकर : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा सिंधुदुर्ग ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली असून कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय शाळा कणकवली क्रमांक तीन च्या इयत्ता सातवीच्या कु. वरद उदय बाक्रे याने ३०० पैकी २४६ गुण मिळवत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक तर कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर याच शाळेच्या इयत्ता सातवीच्या कु. सम्यक चंद्रकांत पुरळकर याने ३०० पैकी २२२ गुण मिळवून कणकवली तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. या शाळेतील इयत्ता सातवीचे एकूण बारा विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेला बसले होते. १२ पैकी १२ म्हणजे शंभर टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

कु.किंजल जयवंत रेवाळे २२० गुण मिळवून कणकवली तालुक्यात चौथी तर कु. संतोषी सुशांत आळवे २१६ गुण मिळवत कणकवली तालुक्यात सहावी आली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल व पदवीधर शिक्षिका सौ अक्षया राणे यांचे मार्गदर्शन लाभले. या शाळेतील इयत्ता चौथीच्या कु. मयंक रविकांत बुचडे यांनी एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २५४ गुण मिळवत कणकवली तालुक्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे त्याला वर्ग शिक्षिका सौ रुपाली डोईफोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे व सर्व सहकारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश चव्हाण, उपाध्यक्ष सौ सायली राणे तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वीही आज पर्यंत रघुनंदन राणे व राज सावंत हे या शाळेचे दोन विद्यार्थी इस्त्रो सफरीला जाऊन आले आहेत आता कु वरद बाक्रे व कु. सम्यक पुरळकर यांची इस्त्रो सफरीसाठी निवड झाल्याने पालक वर्गातून या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स