ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खोटले उपसरपंच व ग्रामस्थ यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.

खोटले उपसरपंच व ग्रामस्थ यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.

प्रकाशन: 03 May 2024 12:37 PM
वाचन संख्या 339

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या खोटले ग्रामपंचायत उपसरपंच व ग्रामस्थ यांनी भाजपा नेते निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपा पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की भाजपा, महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा बॅकलॉग भरून काढत असताना प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुती कटिबद्ध आहे.

ठाकरे गटाचे खोटले ग्रामपंचायत उपसरपंच मानसी महेश चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी महेश सत्यवान चव्हाण, जान्हवी चव्हाण, विलास कदम, अविनाश कदम, यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, गाव प्रमुख प्रभाकर परब, भाजपा बूथ अध्यक्ष अमित ठाकूर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश राणे, शक्ती केंद्रप्रमुख विनायक परब, विजय निकम, यासीन सय्यद, रवी कदम, भाऊ परब, ग्रामपंचायत सदस्य सहदेव मोडक, रणजित परब, तसेच गिरीधर मोडक, अनंत परब, ज्ञानदेव परब, अनंत सावंत, विश्वनाथ परब, विजय घाडीगावकर, शुभांगी साळकर, अर्चना परब, विनया जाधव, शुभांगी परब, अंजली मोडक, अलका मोडक, प्रेमलता मोडक, भक्ती सुद्रीक यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

उपसरपंच यांनी गावच्या अधिकाधिक विकासासाठी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या गावविकासाच्या दृष्टिकोनाचा आदर ठेवत हेदूळ गावात जास्तीत जास्त विकासनिधी केंद्रीय मंत्री राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही प्रयत्नाशील असल्याचे निलेश राणे यांनी सांगत प्रवेशकर्ते यांचे भाजप पक्षात स्वागत केले. यावेळी ग्रामस्थानी विकासकामांबाबत निवेदन निलेश राणे यांना दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट राणे साहेबांनी केला. मात्र गेल्या दहा वर्षात स्थानिक आमदार, खासदार काहीच करू शकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी इथे राणे साहेब तर देशात मोदी सरकारचं येईल. असा विश्वास ग्रामस्थ रवी कदम व अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स