कणकवलीत होणाऱ्या शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनाचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा.
कणकवली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर प्रचार सभा उ शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानात (नरडवे फाटा नजीक) होणार आहे. या प्रचार सभेची जय्यत तयारी सुरू असून इंडिया – महाविकासचे आघाडीचे सर्व नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि जिल्हावासियांनी उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. आमदार वैभव नाईक यांनी सभा स्थळाची पाहणी केली व नियोजनाचा आढावा घेतला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम,संकेत नाईक आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)