ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जनतेचा प्रतिसाद पहाता खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची हॅटट्रीक निश्चित : माजी बांधकाम सभापती मंदार केणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जनतेचा प्रतिसाद पहाता खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची हॅटट्रीक निश्चित : माजी बांधकाम सभापती मंदार केणी.

प्रकाशन: 30 Apr 2024 01:14 PM
वाचन संख्या 154

मालवणात खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे प्रचार ; पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची भावना.

मालवण : महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा प्रचार महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातूनही जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. मालवण शहर परिसरात तसेच रेवतळे प्रभाग मध्येही मंदार केणी यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत घरोघर प्रचार केला.

सर्व ठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहता जनतेच्या पाठिंब्यावर खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मंदार केणी यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, भाई कासवकर, माजी नगरसेविका शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, शहर प्रमुख रश्मी परुळेकर, युवा सेना तालुका समन्वयक तथा मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, पॉली गिरकर, मंगेश वेंगुर्लेकर, जीवन सावबा, सिद्धार्थ परुळेकर, बाळू परुळेकर, शरद धुरी, राजेश पराडकर, अरुण खोले, प्रवीण आंबेरकर, फिलपा, सुरेश माडये, चेतन खोत, प्रथमेश राऊत, अरुण परब, राजु सावंत, विलास परुळेकर, सचिन कांबळी, ललित वेंगुर्लेकर, बाळू परुळेकर, गोविंद खोरजे, कोळंबकर यांसह अन्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स