ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गवंडीवाडा भागात भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी शौचालय दुरावस्थेची घेतली दखल.

गवंडीवाडा भागात भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी शौचालय दुरावस्थेची घेतली दखल.

प्रकाशन: 29 Apr 2024 07:03 PM
वाचन संख्या 57

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाडा परिसरातील विविध कामांची मांगणी तेथील स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या बूथ क्र. ९५ मधील आढावा बैठकीत मांडली होती. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी पुढाकार घेत मालवण शहरातील गावंडीवाडा परिसरातील मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली होती याकडे मालवण नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत होते. या ठिकाणच्या नागरिकांनी हि बाब भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव चलो अभियान’ तसेच बूथ क्रमांक ९५ मधील बैठकीत जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या कडे मांडली असता त्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली. या शौचालायाचा वापर त्या परिसरातील १५ ते २० कुटुंब करत आहेत. सौरभ ताम्हणकर यांनी या ठिकाणाची पाहाणी करत त्या शौचालयाची दुर्दशा तेथील स्थानिक नागरिकांकडून जाणून घेत तात्काळ त्याठिकाणी तुटलेला लाईट स्विच, तुटलेले दरवाजे तर काही दरवाज्यांना तुट्लेली कडी हि तात्काळ उपलब्ध करून देत ते बदलण्याचे कामं सध्या सुरु आहे. त्याच प्रमाणे त्या सौचालयातील विद्युत पुरवता गेले दोन वर्ष खंडित झाला होता त्यावर सौरभ ताम्हणकर यांनी मालवण वीज वितरण विभागाशी संपर्क साधून याबाबत कार्यवाहीच्या सूचना केल्या.
त्याचप्रमाणे मालवण गवंडीवडा ते मालवण बाजारपेठ परिसरातील स्ट्रीट लाईट गेले अनेक महिने बंद होते. याची माहिती मिळताच सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपरिषदेशी संपर्क साधतं लाईट उपलब्ध करून घेत तात्काळ कॉन्ट्रॅक्टर तुषार जुवेकर यांच्या सहकार्याने बदलून घेतले.

त्याचप्रमाणे गवंडीवाडा प्रभागातील उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी यावेळी म्हंटले आहे. नागरीकांनी सौरभ ताम्हणकर यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स