ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा येथे 'मधली सुट्टी विद्यार्थी विकास प्रशिक्षण शिबीर' सुरु...
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा येथे 'मधली सुट्टी विद्यार्थी विकास प्रशिक्षण शिबीर' सुरु...

प्रकाशन: 29 Apr 2024 05:14 PM
वाचन संख्या 94

मसुरे | प्रतिनिधी : रोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सहकार्याने बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे ‘मधली सुट्टी’ विद्यार्थी विकास प्रशिक्षण या १० दिवसीय शिबीराचा शुभारंभ व्हर्सटाईल एडुकेअर सिस्टिमचे प्रमुख डॉ अजय दरेकर व रोटरीयन रश्मी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. रोटरीयन रश्मी पाटील यानी या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्याना दिली. शाळेचा अभ्यास व पुढचे करियर यातील मधला दुवा म्हणून हे प्रशिक्षण महत्वाचे आहे. आपणाकडे भरपूर गुणवत्ता असून ती गुणवत्ता वाढवणे व आपल्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचा परिचय करून घेणे आवश्यक आहे त्या दृष्टीने हे शिबीर महत्वाचे आहे सर्वांनी १० दिवस नियमीतपणे या शिबीरास उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.

व्हर्सटाईल एड्युकेअर सिस्टम मुंबईचे प्रमुख डॉ अजय दरेकर यानी प्रशिक्षण शिबीराचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्याना सांगितले हे शिबीर मी व्याखाता व तुम्ही श्रोते अशाप्रकारचे नसून तुमच्या सक्रीय सहभागाने तुमच्यातील व्यक्तिमत्व विकसीत करण्याचे काम आपणास करावयाचे आहे आपण सर्वांनी जिद्दीने परिश्रमाने आनंदाने व शिस्तबद्ध रितीने हे प्रशिक्षण यशस्वी करूया असं त्यांनी सांगितले. दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणाला रोटरी क्लब माहिम मुंबई यानी अर्थसहाय्य केले आहे. वराडकर हायस्कूल कट्टा, माध्यमिक विद्यालय चौके, सौ हि भा वरसकर विद्यामंदिर वराड, न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या शाळांचे ४४ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या सोहळ्यास रोटरीयन रश्मी पाटील, डॉ अजय दरेकर, सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, कार्यकारिणी सदस्य विद्या चिंदरकर, विश्वस्त दीपक भोगटे, पेंडूर हायस्कूलचे संगम चव्हाण, कट्टा हायस्कुलचे महेश भाट,चौके हायस्कूलचे प्रसाद परुळेकर, मनोज काळसेकर, बाळकृष्ण गोंधळी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स