ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नामवीणा सप्ताहास प्रारंभ ; वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नामाचा जप अखंड चालू ठेवण्याची परंपरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नामवीणा सप्ताहास प्रारंभ ; वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नामाचा जप अखंड चालू ठेवण्याची परंपरा.

प्रकाशन: 29 Apr 2024 03:52 PM
वाचन संख्या 159

अक्कलकोट | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात २९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता झाली. या नामवीणा सप्ताहाचा शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष / नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी वटवृक्ष मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीणापूजन मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते होऊन सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. तदनंतर मंदार महाराजांच्या हस्ते प्रथमेश इंगळे यांच्या हाती वीणा देण्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात अखंड नामविणा सप्ताहास अनन्य साधारण महत्व असून सतत ७ रात्र आणि दिवस हा वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नाम घेत अखंड चालू ठेवणेची परंपरा आज देखील देवस्थानने जपली आहे. श्रद्धेय भक्ती भावाने स्वामी भक्त या सेवेत सहभागी होत असतात. या वीणा सप्ताहात इच्छूक भाविकांना १ तास वीणा हाती घेण्याची स्वामी सेवेची संधी देण्यात येते. इंगळे परिवाराच्या वतीने वीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही चौथी पिढी आहे. या पुढील सात दिवस या नामवीणा सप्ताहात अनेक भाविक सहभागी होवून श्रींच्या चरणी सेवा अर्पण करतात. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी रोजी सकाळी ७ वाजता या वीणा सप्ताहाची समाप्ती होते.

यावेळी मंदिर समिती सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, इरपा हिंडोळे, कौशल्या जाजू, प्रदीप हिंडोळे, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, अमर पाटील, बाबा सुरवसे, दर्शन घाटगे, राजू हिप्परगी, अक्षय सरदेशमुख, बाबर, निर्मलाताई हिंडोळे, सुरेखा तेली, स्वाती गंभीरे, भंडारे, प्रसाद सोनार, बाळासाहेब घाटगे, प्रसन्न हत्ते, नागनाथ गुंजले, गिरीश पवार, संजय पवार, संतोष पराणे, ऋषिकेश लोणारी, विश्वास शिंदे, सचिन हन्नूरे, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स