ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग सुपुत्र व मुंबईत नियुक्त पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांचा उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मान..!

सिंधुदुर्ग सुपुत्र व मुंबईत नियुक्त पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांचा उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मान..!

प्रकाशन: 26 Apr 2024 05:34 PM
वाचन संख्या 122

सिंधुदुर्ग ( कणकवली ब्यूरो ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कणकवली तालुक्यातल्या साकेडी गांवचे मुंबई शहरामध्ये नियुक्ती असलेले पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दिगंबर वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल मुंबई शहरामध्ये नियुक्ती असलेले पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दिगंबर वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही निवड जाहीर केली आहे.

गडचिरोली नक्षलग्रस्त भागासह, लोहमार्ग पोलीस यासह अन्य राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. पांडुरंग वालावलकर यांच्या या नियुक्ती बद्दल सिंधुदुर्ग सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांचे कणकवली तालुका व जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स