ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश..!

श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश..!

प्रकाशन: 18 Oct 2021 10:57 AM
वाचन संख्या 183

ब्युरो न्यूज | प्राजक्ता पेडणेकर : मध्य प्रदेश उज्जैन येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ जणांनी सहभाग घेऊन तब्बल पंधरा  पदके पटकावत  विजय मिळवला. श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे प्रशिक्षक श्री गणेश  देवरुखकर  यांच्या परिश्रमाने तसेच खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीने आणि पालकांच्या मदतीने ही गोष्ट शक्य झाली आहे.
कोरोना नंतरच्या या पहिल्याच स्पर्धेत  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण १३ खेळाडूंची निवड झाली. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी कमी वेळेत आपले जास्तीत जास्त चांगले कौशल्य दाखवले. त्यातीलच आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि ते आठवड्याभरातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी उज्जैनला रवाना झाले. या आठ खेळाडूंनी वैयक्तिक सात पदके आणि सांघिक आठ पदके अशी एकूण १५ पदकांची लयलूट केली आणि श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे आणि गणेश सरांचे नाव लौकिक केले.
तनश्री जाधव हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात पुरलेल्या मल्लखांबात सुवर्णपदक, दोरी मल्लखांबात रौप्यपदक  आणि वैयक्तिक विजेतेपदा मध्ये देखील रौप्यपदक पटकावले तसेच सांघिक सुवर्णपदक असे एकूण चार पदके पटकावली.
ॠषभ घुबडे याने १८ वर्षाखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात कास्यपदक तसेच दोरी मल्लखांबात कांस्यपदक तर सांघिक रौप्यपदक अशी एकूण तीन पदके पटकावली.
सोहम शिवगण याने देखील १४ वर्षाखालील गटात वैयक्तिक विजेतेपदात कांस्यपदक तसेच सांघिक कांस्य पदक पटकावले आहे.
आदी वायंगणकर याने १४ वर्षाखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात वैयक्तिक कास्यपदक आणि सांघिक विजेतेपदामध्ये देखील कास्य पदक पटकावले.
तसेच अक्षय तरळ याला देखील खुल्या गटात सांघिक सुवर्णपदक मिळाले आहे.
त्याचप्रमाणे १२ वर्षाखालील गटात सानवी देसाई आणि शिवांगी पै यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक  मिळविले.  पार्लेश्वर व्यायाम शाळेचे मार्गदर्शक श्री महेश अटाळे सर तसेच गणेश देवरुखकर इशा देवरुखकर आणि अविनाश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स