ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कासार्डे येथे माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.

कासार्डे येथे माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.

प्रकाशन: 20 Apr 2024 10:35 AM
वाचन संख्या 233

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सहसंयोजक, सिंधुरत्न समृध्दी समिती सदस्य तथा माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांचा ५९ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या कासार्डेतील निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, हितचिंतक यानी उपस्थित राहून श्री. प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या.

देशाच्या सीमेवर जे जवान काम करत आहेत त्याच्या आणि आपल्या सर्वाच्या आयुष्यात असेच वाढदिवस यावेत. सुख समृद्धी येवून कोकणच्या विकासाची भरभराट होवूदे अशी आपण प्रार्थना करतो असे मनोगत त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या अभिष्टचिंतन सोहळ्याला केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. नारायण राणे याच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद जठार याच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्री. जठार यांच्या पत्नी सौ. नीरजा जठार, सौ निलम राणे,आमदार नितेश राणे,अभिषेक जठार, आदित्य जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, डाॅ.मिलिंद कुलकर्णी, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजपा महिला प्रदेश सदस्या दिपलक्ष्मी पडते, प्रमोद जठार मित्रमंडळ अध्यक्ष प्रसाद जाधव, शिडवणे सरपंच रविंद्र शेटये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, मानसी वाळवे याच्यासह, प्रमोद जठार मित्रमंडळ, रत्नागिरी – सिंधुदुर्ग येथील भाजपा पदाधिकाऱ्यांसह प्रमोद जठार प्रेमी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे म्हणालेकी प्रमोद जठार यांचा आजचा शुभदिवस माझाही शुभदिवस आहे. प्रमोद जठार याना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व त्याच्या मनातील मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना मी माझ्या श्री देव रामेश्वराकडे करतो. आजच्या वाढदिवसाबरोबर पुढील पंचाहत्तर व शंभराव्या वाढदिवसाला मला बोलवतील असे सांगत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने प्रमोद जठार यांच्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी सकाळपासूनच रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथिल भाजपा पदाधिकाऱ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शैक्षणिक, पत्रकार व प्रमोद जठार प्रेमी यांनी उपस्थित राहत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेत कलारंजन मुंबई निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

( फोटो : श्री. अनिकेत जामसांडेकर )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स