इंडीया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या शहरातील प्रचाराचा झाला शुभारंभ..!
मालवण : रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना इंडीया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या शहरातील प्रचाराचा शुभारंभ देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिर येथे करण्यात आला. यावेळी श्री देव रामेश्वर चरणी विनायक राऊत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होण्यासाठी गाऱ्हाणे घालून शहरातील प्रचार सुरू करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालूकाप्रमुख हरी खोबरेकर, काँग्रेस विधानसभा प्रमुख अरविंद मोंडकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, नितीन वाळके, शिवसेना शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष सेजल परब, मंदार ओरसकर, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत परुळेकर, बाळू अंधारी, यतीन खोत, जेम्स फर्नांडिस, महेश जावकर, यशवंत गावकर, शिवसेना तालुकाप्रमुख दिपा शिंदे, शिवसेना महिला तालुका समन्वय पूनम चव्हाण, वायरी ग्रामपंचायत सदस्य ममता तळगावकर, पराग माणगावकर, लुईस मेंडीस, रश्मी परुळेकर, निनाक्षी मेथर, आकांक्षा शिरपुटे, नीना मुंबरकर, गणेश पाडगावकर, भिवसेन परुळेकर, विजय नेमळेकर, नरेश हुले, मंदा जोशी, मोहन मराळ, सिद्धेश मांजरेकर, राजू परब, मनोज मोंडकर, हेमंत मोंडकर, गौरव वेर्लेकर, बंड्या लुडबे सोबत शहरातील सर्व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप पदाधिकारी, कार्यकर्ते, इंडिया आघाडी कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)