ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरवल येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिगंबर पांचाळ कालवश.

शिरवल येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिगंबर पांचाळ कालवश.

प्रकाशन: 19 Apr 2024 07:29 AM
वाचन संख्या 84

कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली तालुक्यातील शिरवल सुतारवाडी येथील रहिवासी तथा‌ सामाजिक कार्यकर्ते श्री. दिगंबर धोंडु पांचाळ वय (६५ वर्षे) यांचे गुरुवारी १८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता शिरवल येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दिगंबर पांचाळ हे उत्तम पेंटर होते. शिरवल गावचे शिवसेना शाखा प्रमुख पद त्यांनी भूषविले होते. शिरवल गावच्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. गावच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. त्यांच्या जाण्याने शिरवल गावातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे,सुना,एक विवाहित मुलगी, जावई, भाऊ,भावजय, पुतणे पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शिरवल येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शिरवल गावातील आणि कणकवली तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स